पुलाखालील पाण्याची शेलारवाडीला समस्या कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुलाखालील पाण्याची 
शेलारवाडीला समस्या कायम
पुलाखालील पाण्याची शेलारवाडीला समस्या कायम

पुलाखालील पाण्याची शेलारवाडीला समस्या कायम

sakal_logo
By

पिंपरी, ता. ११ : पुणे-लोणावळा रेल्वेमार्गावरील शेलारवाडी येथील रेल्वेच्या वतीने करण्यात आलेल्या भुयारी मार्गात पावसाच्या पाण्याची समस्या कायम असून रेल्वे प्रशासनाने ठेकेदाराला ताकीद दिली आहे. त्या ठिकाणच्या पाणी समस्येवर लवकरात-लवकर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी त्रस्त शेलारवाडी वासियांनी केली आहे.
कॅन्टोन्मेंटचे माजी उपाध्यक्ष अशोकराव शेलार म्हणाले, शेलारवाडीत जाण्यासाठी सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने रेल्वेने भुयारी पुलाची निर्मिती केली आहे. मात्र कोट्यावधी रुपये खर्च करूनही पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साठत आहे. त्यामुळे मोठी वाहने जाताना उडणाऱ्या पाण्याचा पादचाऱ्यांना त्रास होत आहे.
शेलारवाडीकरांच्या सामूहिक प्रयत्नातून पाणी उपशासाठी दोन मोटारी लावल्या होत्या. परंतु आता पावसामुळे या पाणी उपशावर मर्यादा आल्या आहेत.

काम रखडले...
पुलाखाली साठणारे पाणी इंद्रायणी नदीला सोडता यावे यासाठी रेल्वेकडून उपयोजना करण्यात येत आहे. वाहिन्या टाकण्यासाठी रेल्वेच्या बाजूने खोदाई करण्यात आली आहे. मात्र सध्या पावसामुळे या खोदलेल्या ठिकाणी तळ्याचे स्वरूप आल्याने सदर काम ठप्प झाले आहे.

रस्ता खचला...
येथील भुयारी पुलास जोडून शेलारवाडी गावात जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. मात्र सध्याच्या संततधार पावसामुळे हा मातीचा रस्ता खचला असून निसरडा झाला आहे. तात्पुरती उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली. दरम्यान रेल्वेच्या देहूरोड कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.

तळेगावातील भुयारी पुलाखाली समस्या कायम...
रेल्वेमार्गावरील तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील हिंदमाता भुयारी पुलाखाली रोजच तळे साठत आहे. कोट्यावधी रुपये खर्च झालेल्या या पुलाचे काम करताना पावसाळी पाणी साठू नये या दृष्टीने काम करताना तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष झाल्यानेच पाण्याची समस्या उद्‍भवल्याचे माजी नगरसेवक व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष भेगडे यांनी सांगितले. पाणी उपशासाठी ठेकेदारावर नगरपरिषदेचे लाखो रुपये खर्च होत असल्याकडेही संतोष भेगडे यांनी लक्ष वेधले.

KIW22B01616

Web Title: Todays Latest Marathi News Kiw22b00848 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..