राजारामनगर-आदर्शनगर रस्ता रुंदीकरण करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजारामनगर-आदर्शनगर रस्ता 
रुंदीकरण करण्याची मागणी
राजारामनगर-आदर्शनगर रस्ता रुंदीकरण करण्याची मागणी

राजारामनगर-आदर्शनगर रस्ता रुंदीकरण करण्याची मागणी

sakal_logo
By

किवळे, ता. १४ : येथील राजारामनगर ते आदर्शनगर व्हाया मुकाई चौकाकडे जाणारा गावपांदन अरुंद रस्ता वाढलेल्या वाहतुकीमुळे अपघाताला निमंत्रण देणारा ठरला असून या मार्गाचे रुंदीकरण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्याम भोसले म्हणाले, ‘‘देहूरोड रेल्वे स्टेशनकडून लोहमार्गाच्या कडेने बापदेवनगर ते जुनवणे विटभट्टी पर्यंत महानगर पालिकेने रस्ता केला आहे. पुढे किवळे राजारामनगर ते रावेत हद्दीपर्यंत गावपांदन रस्ता वेळोवेळी मागणी करूनही पालिका व लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे आजतागायत अरुंदच राहिला आहे. रस्त्यावर मोठी मालवाहतूक तसेच आरसीएम प्लॉट वाहतूक, महापालिका बस सेवा यामुळे कोंडीत दिवसेंदिवस वाढत होत आहे. पावसात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांची गैरसोय होत आहे. या बाबत पालिका ‘ब’ प्रभाग स्थापत्यने लवकर उपाययोजना करावी अन्यथा रस्त्यावरील अवजड वाहतूक व बस यांना हा मार्ग स्थानिक नागरिकांच्या वतीने बंद करण्यात येईल, याची नोंद संबंधित स्थापत्यने अधिकाऱ्यांनी घ्यावी, असा इशारा श्याम भोसले यांनी दिला आहे.

kiw13002p1,p2 :

Web Title: Todays Latest Marathi News Kiw22b00853 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..