गुणवंत विद्यार्थ्यांचा वाल्हेकरवाडीत गौरव सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुणवंत विद्यार्थ्यांचा 
वाल्हेकरवाडीत गौरव सोहळा
गुणवंत विद्यार्थ्यांचा वाल्हेकरवाडीत गौरव सोहळा

गुणवंत विद्यार्थ्यांचा वाल्हेकरवाडीत गौरव सोहळा

sakal_logo
By

किवळे, ता. २१ : वाल्हेकरवाडी येथील जिजाऊ सोशल फाउंडेशनच्यावतीने दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला. येथील संत मोनी बाबा बाळा आश्रमात भारत मातेच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. परिसरातील शंभर विद्यार्थ्यांना फाइल आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमात संतोष वरेकर, संदेश मुखेडकर, संदीप मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यात नेमके काय करायला पाहिजे, याबाबत बहुमूल्य मार्गदर्शन केले. शिवसेना विभाग प्रमुख ज्योती भालके, संदीप भालके यांनी आयोजन केले. यावेळी पोलिस मित्र संघटनेचे अध्यक्ष गजानन चिंचवडे, महेश कलाल, कमलजित सिंग, प्रशांत हादगे, सुनीता भालके उपस्थित होते. संतोष पाचपुते यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kiw22b00876 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..