शेलारवाडी तलावात टाकला जातोय कचरा अन् बाटल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेलारवाडी तलावात टाकला 
जातोय कचरा अन् बाटल्या
शेलारवाडी तलावात टाकला जातोय कचरा अन् बाटल्या

शेलारवाडी तलावात टाकला जातोय कचरा अन् बाटल्या

sakal_logo
By

पिंपरी, ता. २१ : शेलारवाडी येथील अमरदेवी पालखी मार्गालगत असलेल्या नैसर्गिक तलावावर फिरण्यास येणाऱ्या पर्यटकांकडून विशेषतः यातील तरुणांकडून येथील तलावात कचरा आणि बाटल्या फेकण्यात येत असून तलावाचे प्रदूषण होत आहे. संबंधित प्रश्न स्थानिक पोलिसांनी लक्ष घालण्याची मागणी शेलारवाडीवासीयांनी केली आहे.
या बाबत स्थानिक रहिवासी व शिक्षक राजू भेगडे म्हणाले, ‘‘शेलारवाडीचे ग्रामदैवत श्री अमरदेवी मातेच्या पालखी मार्गासाठी शेलारवाडी गेटपासून पुणे-मुंबई महामार्गापर्यंत रस्ता बनविण्यात आलेला आहे. परंतु त्या ठिकाणी काही बाहेरचे पर्यटक तरुण मुले-मुली सहज फिरण्यासाठी येत असतात. त्यांच्याकडून तलावात आणि इस्तता प्लॅस्टिक कचरा फेकला जातोय.
अमरदेवी पालखी मार्गाला जोडून सोयीसाठी लोहमार्गाखाली भुयारी मार्ग बनविण्यात आला असून, या मार्गामध्ये पुन्हा पुन्हा आठ ते दहा फुटापर्यंत पाणी साचत आहे. त्यामुळे अधूनमधून मार्ग बंद करावा लागत आहे. गावातील अनेक तरुण मुलांनी त्या मार्गासाठी मदत करून त्यातील चिखल व माती दूर करून वेळोवेळी तो पुन्हा चालू केला आहे.तसेच गावातील तरुणांनी आर्थिक मदत करून त्या ठिकाणी मोटर इंजिन बसवून वेळोवेळी पाणी काढण्याचे काम केले. रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी ग्रामस्थांनी प्राधान्याने मागणी केलेली आहे.
देहूरोड पोलिस ठाण्यातील संबंधित अधिकाऱ्यांनी या तरुण मुलांना वेळोवेळी बंदोबस्त करून त्या ठिकाणी कचरा व इतर सर्व पदार्थ टाकण्यापासून परावृत्त करावे व शेलारवाडीचे वैभव, तेथील झाडी त्या ठिकाणी तयार केलेले तळे या सर्व गोष्टींचे सौंदर्य अबाधित राहावे व निसर्गसौंदर्य जतन करी निसर्गाची होणारी हानी टाळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

फोटो ओळ : kiw21002p1,p2 :
शेलारवाडी ः अमरदेवी पालखी मार्गालगतच्या तलावात साठलेला कचरा आणि बाटल्या.
p2 :

Web Title: Todays Latest Marathi News Kiw22b00877 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..