जाहिरातदार/ किवळे रावेत सोसायटीकडून सभासदांना 12% ला पण जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जाहिरातदार/ किवळे रावेत सोसायटीकडून सभासदांना 12% ला पण जाहीर
जाहिरातदार/ किवळे रावेत सोसायटीकडून सभासदांना 12% ला पण जाहीर

जाहिरातदार/ किवळे रावेत सोसायटीकडून सभासदांना 12% ला पण जाहीर

sakal_logo
By

किवळे रावेत सोसायटीकडून
बारा टक्के लाभांश जाहीर


किवळे, ता. २६ : किवळे रावेत विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी
खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात पार पडली. सभेत सभासद शेतकऱ्यांना बारा टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. सोसायटीच्या देहूरोड येथील कार्यालय आवारात सोसायटीचे अध्यक्ष रामदास दांगट यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली.
सोसायटीचे उपाध्यक्ष नामदेव मुसुडगे, संचालक रवींद्र चव्हाण, दिवाणजी भोंडवे, दिनकर कातळे, बाळासाहेब तरस,
मच्छिंद्र भोंडवे, भावेश चव्हाण, धोंडीबा भोंडवे, नरेंद्र सोनटक्के, मनोहर भोंडवे, कल्पना फडके, शैला भोंडवे, सचिव गजानन रणपिसे तसेच किवळे, रावेत, मामुर्डीतील सभासद शेतकरी उपस्थित होते.
अध्यक्ष रामदास दांगट म्हणाले, ‘‘सोसायटीचे एकूण ५१७ सभासद शेतकरी आहेत. सभासदांनी मध्यम मुदतीच्या कर्जासाठी सोसायटीशी संपर्क साधावा यात पीक कर्ज, शेतीला लागणारी अवजारे जसे की ट्रॅक्टर तसेच यात जीपगाडीचाही समावेश आहे.
संचालक मनोहर भोंडवे, दिनकर कातळे, बाळासाहेब तरस यांनी मनोगत व्यक्त केले. सभासद शेतकरी रजनीकांत भोंडवे, दत्तात्रेय राऊत यांनी १२ टक्के लाभांश दिल्याबद्दल संचालकांचे आभार मानत सोसायटीने आता ब वर्ग दर्जावरून अ वर्ग दर्जासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.


फोटो ः ०1704

Web Title: Todays Latest Marathi News Kiw22b00890 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..