रावेतला इंद्रायणी वाणाचे भाताचे पीक जोमात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रावेतला इंद्रायणी वाणाचे 
भाताचे पीक जोमात
रावेतला इंद्रायणी वाणाचे भाताचे पीक जोमात

रावेतला इंद्रायणी वाणाचे भाताचे पीक जोमात

sakal_logo
By

किवळे, ता. २८ ः रावेतला इंद्रायणी वाणाचे भाताचे पीक जोमात असून, एकरी ४० पोती भाताचे उत्पन्न अपेक्षित असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
रावेतचा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये १९९६ मध्ये समावेश झाल्यानंतर गेल्या काही वर्षात पालिकेच्या माध्यमातून अधिक रुंदीचे अंतर्गत रस्ते, लगतच्या शहराला जोडणारे प्रमुख बीआरटी रस्ते तसेच उद्याने, शाळा त्याचप्रमाणे स्थानिक जमीनधारक आणि बांधकाम व्यवसायिकांच्या माध्यमातून टोलेजंग इमारती उभ्या राहिल्याने परिसरात शेतजमिनीखालील क्षेत्र कमी झाले आहे.

मात्र अशाही परिस्थितीत काही शेतकऱ्यांनी शेतीला प्राधान्य दिले आहे. भात उत्पादक शेतकरी पंडित भोंडवे, मनोहर भोंडवे, दिवानजी भोंडवे, खंडू भोंडवे म्हणाले की, रावेतला फुलजाई माता मंदिर परिसरात इंद्रायणी वाणाचे भात पीक दरवर्षी आवर्जून घेतले जाते. रावेत परिसरात सुमारे पाच ते सहा एकर क्षेत्रामध्ये सध्या भात पीक जोमदार आहे. मुबलक पाऊस तसेच विहिरी आणि कूपनलिकेच्या माध्यमातून पाण्याचे स्त्रोत मुबलक आहेत. त्यामुळे पावसाने कदाचित उघडीप घेतली तरी भातास पाण्याची कमतरता भासणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kiw22b00896 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..