महामार्गावरील पथदिवे धोकादायक शंकरवाडी ते सेंट्रल दरम्यानची परिस्थिती, अपघाताची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महामार्गावरील पथदिवे धोकादायक 
शंकरवाडी ते सेंट्रल दरम्यानची परिस्थिती, अपघाताची शक्यता
महामार्गावरील पथदिवे धोकादायक शंकरवाडी ते सेंट्रल दरम्यानची परिस्थिती, अपघाताची शक्यता

महामार्गावरील पथदिवे धोकादायक शंकरवाडी ते सेंट्रल दरम्यानची परिस्थिती, अपघाताची शक्यता

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३१ : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील पुणे मुंबई महामार्गावरील शंकरवाडी ते सेंट्रल चौक दरम्यान बंद असलेले काही पथदिवे कोसळण्याच्या स्थितीत असून, अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
धोकादायक खांब त्वरित काढावेत, अशी मागणी सजग नागरिकांनी केली आहे. कॅन्टोन्मेंट हद्दीतील नागरिकांचा रात्रीचा प्रवास सुरक्षित व्हावा, या उद्देशाने कॅन्टोन्मेंटच्यावतीने ८ वर्षांपूर्वी एलईडी दिवे बसविण्यात आले होते. मात्र काही कालावधीनंतर देखभाल आणि दुरुस्तीकडे काही कारणाने स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने ते आजतागायत ते बंदच आहेत.
यातील काही खांबांवरील दिवे निखळले आहेत तर काही पडण्याच्या स्थितीत आहेत. दुसरीकडे ठिकठिकाणचे काही खांब वाकलेल्या स्थितीत आहेत. पुणे - मुंबई हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने दिवस रात्र वाहतूक सुरू असते. दिवे अथवा एखादा खांब पडल्यास दुचाकी अथवा मोठ्या वाहनाचा अपघात संभवतो. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने देखभाल दुरुस्तीकडे लक्ष देऊन हे एलईडी दिवे सुरू करावेत तसेच धोकादायक खांब काढून टाकावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार माने यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान पथदिवे सुरू करण्याची मागणी शेलारवाडी येथील धोंडिबा शेलार, मृणाल माळी, सदानंद शेलार, गोविंद शेलार यांनीही केली आहे.

आठ वर्षांपूर्वी या एलईडी दिव्यांमध्ये ‘आयआरबी’कडून दुभाजक तयार केले गेले. यात केबलमध्ये बिघाड झाला. खर्च करायचा कोणी या मुद्यावरून आजतागायत दिवे बंदच आहेत. यात सामान्यांची मात्र गैरसोय सुरू आहे.
-अशोकराव शेलार, माजी उपाध्यक्ष कॅन्टोन्मेंट

आज गणपतीची सुटी असल्याने कॅन्टोन्मेंट कार्यालय बंद आहे. उद्या (ता. १) पथदिव्यांची पाहणी करून धोकादायक खांब काढण्याच्या सूचना विद्युत विभागास दिल्या जातील.
- ॲड. कैलास पानसरे, नामनिर्देशित सदस्य कॅन्टोन्मेंट


01720, 01721

Web Title: Todays Latest Marathi News Kiw22b00897 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..