किवळे,रावेत,पुनावळेत ढोल पथकाच्या निनादात मिरवणूक काढून लाडक्या गणरायाची प्रतिष्ठापना उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किवळे,रावेत,पुनावळेत ढोल पथकाच्या निनादात मिरवणूक काढून लाडक्या गणरायाची प्रतिष्ठापना उत्साहात
किवळे,रावेत,पुनावळेत ढोल पथकाच्या निनादात मिरवणूक काढून लाडक्या गणरायाची प्रतिष्ठापना उत्साहात

किवळे,रावेत,पुनावळेत ढोल पथकाच्या निनादात मिरवणूक काढून लाडक्या गणरायाची प्रतिष्ठापना उत्साहात

sakal_logo
By

ढोल पथकाच्या निनादात
किवळे परिसरात मिरवणूक
-----------------------------
किवळे, ता. ३१ ः वाल्हेकरवाडी, रावेत, पुनावळे, मामुर्डीत विधीवत पूजन करून गणेश भक्तांनी घरगुती तसेच विविध मंडळांच्यावतीने मोठ्या उत्साहात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. पुढील १० दिवस भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
किवळे मुकाई चौकातील किवळे गावचा राजा श्री बापदेव मित्र मंडळ ट्रस्टच्या गणपतीची प्रतिष्ठापना उपसरपंच बापूसाहेब तरस यांनी केली. यावेळी ट्रस्टचे निलेश तरस, सुमित तरस, मयूर तरस, गणेश तरस, प्रशांत म्हसुडगे, राजू म्हसुडगे, दीपक तरस, शरद तरस, स्वप्निल तरस, राजेश तरस, मोरेश्वर तरस, किशोर वीर उपस्थित होते. कोतवालनगर येथील त्रिशूल मित्र मंडळाच्यावतीने प्रतिष्ठापना करण्यात आली.
विकासनगर येथील मकरंद मित्र मंडळ, त्रिशूल मित्र मंडळ, क्रांती मित्र मंडळ, जागृत मित्र मंडळ आणि हनुमान कॉलनी मित्र मंडळाच्यावतीने गणपतीची प्रतिष्ठापना झाली असून, पुढील दहा दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती शिवसेनेचे युवासेना पिंपरी चिंचवड उपशहर अधिकारी राजेंद्र तरस यांनी दिली.
विकासनगर येथील श्री शिव छत्रपती तरुण मंडळाच्यावतीने लाडक्या गणरायाची ढोल पथकाच्या निनादात मिरवणूक काढून संध्याकाळी संतोष कोळपे यांच्या हस्ते सपत्निक प्रतिष्ठापना करण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष शुभम दांगट यांनी दिली. माळवालेनगर येथील शिव संदेश मित्र मंडळाच्यावतीने गणपती मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येत असल्याने गणपतीची साध्या पद्धतीने प्रतिष्ठान करण्यात आल्याची माहिती मंडळाचे राहुल हापसे यांनी दिली.
पुनावळ्यात उत्साह
पुनावळे गाव आणि परिसरातील गगनगिरी मित्र मंडळ, नवयुग मित्र मंडळ, सन्मित्र क्रिकेट क्लब, संत सावता माळी मित्र मंडळ, गणराज मित्र मंडळ, अमर मित्र मंडळ, श्री भैरवनाथ तरुण मंडळ कोयतेवस्ती येथील रणखांब मित्र मंडळाच्यावतीने विधिवत मोठ्या उत्साहात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आल्याची माहिती संत तुकाराम कारखान्याचे संचालक चेतन भुजबळ यांनी दिली.

फोटो ः मुकाई चौक, किवळे गावचा राजा श्री बापदेव मित्र मंडळ ट्रस्टच्या गणपतीची प्रतिष्ठापना उपसरपंच बापूसाहेब तरस यांनी केली.
फोटोः 01732

Web Title: Todays Latest Marathi News Kiw22b00906 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..