किवळेत राजस्थानचा राजवाडा ठरला आकर्षण रावेत, किवळे, विकासनगर परिसरात सामाजिक, धार्मिक देखाव्यांवर भर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किवळेत राजस्थानचा राजवाडा ठरला आकर्षण
रावेत, किवळे, विकासनगर परिसरात सामाजिक, धार्मिक देखाव्यांवर भर
किवळेत राजस्थानचा राजवाडा ठरला आकर्षण रावेत, किवळे, विकासनगर परिसरात सामाजिक, धार्मिक देखाव्यांवर भर

किवळेत राजस्थानचा राजवाडा ठरला आकर्षण रावेत, किवळे, विकासनगर परिसरात सामाजिक, धार्मिक देखाव्यांवर भर

sakal_logo
By

किवळे, ता. ५ : रावेत, किवळे आणि विकासनगर परिसरात सामाजिक, धार्मिक देखाव्यांवर मंडळांनी भर दिला आहे.
मुकाई चौकातील श्री बापदेव मित्र मंडळ ट्रस्टने राजस्थानचा राजवाडा सादर केला आहे. दर्शनासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी होत असल्याचे ट्रस्टचे निमंत्रक निलेश तरस, अध्यक्ष सुमित तरस यांनी सांगितले. पराग तरस, सतिश तरस, राजेश तरस, नीलेश तरस, मयूर तरस, गणेश तरस, नीलेश तरस, भाऊ सांडभोर संयोजन करत आहेत.
विकासनगर येथील नवनाथ अपार्टमेंटमधील श्रीकृष्ण मित्र मंडळाने काल्पनिक महल देखावा सादर केल्याचे संस्थापक तुषार तरस, अध्यक्ष रोहित चोरगे, उपाध्यक्ष प्रसाद साबळे, खजिनदार मंगेश तरस यांनी सांगितले. दांगटवस्ती येथील श्री शिवछत्रपती तरुण मंडळ ट्रस्टने फुलांची आकर्षक सजावट केली आहे. शिवाजी दांगट संस्थापक तर शुभम दांगट अध्यक्ष आहेत.
कोतवानगर येथील त्रिशूल मित्र मंडळाने गणपती मंदिरावर विद्युत रोषणाई केली आहे. सागर तरस अध्यक्ष आहेत. नेटके कॉलनीतील हनुमान तरुण मित्र मंडळाने देशभक्तीपर जिवंत देखावा सादर केला आहे. राजेंद्र नेटके मंडळाचे संस्थापक तर मनोज वायदंडे अध्यक्ष आहेत. अविनाश गाडे यांची संकल्पना असून, माजी उपमहापौर किसनराव नेटके, माजी नगरसेविका सुमन नेटके, राहुल नेटके, मयूर पांडे संयोजन करत आहेत. क्रांती गणेशोत्सव मंडळाने धार्मिक देखावा तर यंग स्टार मित्रमंडळाने मंदिराची प्रतिकृती उभारली आहे.
रावेतला उत्साह...
शिंदेवस्ती रावेत येथील शिवछत्रपती चौकातील गणेश मित्र मंडळ, ओम साई प्रतिष्ठानमार्फत महिलांच्या भजनाचे कार्यक्रम सुरु असल्याचे किवळे रावेत सोसायटीचे संचालक मनोहर भोंडवे तसेच विजय भोंडवे, किसन भोंडवे, अभिजित भोंडवे यांनी सांगितले. रावेत गावठाणातील श्री धर्मराज प्रतिष्ठानने गणपतीची प्रतिष्ठाना केली. भोंडवे वस्तीतील अष्टविनायक तरुण मित्र मंडळाने महालाची प्रतिकृती उभारल्याचे अध्यक्ष उज्वल भोंडवे यांनी सांगितले.

फोटो ओळ : kiw5002p1
मुकाई चौक, किवळे ः बापदेव मित्र मंडळ ट्रस्टने उभारलेला राजस्थानचा राजवाडा

p3 :

Web Title: Todays Latest Marathi News Kiw22b00912 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..