किवळेतील भजन स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किवळेतील भजन स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद
किवळेतील भजन स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद

किवळेतील भजन स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद

sakal_logo
By

किवळे, ता. १० : श्री सिद्धिविनायक मित्रमंडळाच्या रौप्य महोत्सवानिमित्त झालेल्या भजन स्पर्धेत ताथवडेतील स्वरांजली भजनी मंडळाने प्रथम क्रमांक पटकविला. बापू कातळे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.
पंचक्रोशीतील भजनी मंडळांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेत स्वरांजली भजनी मंडळ (प्रथम), जय गणेश महिला भजनी मंडळ (द्वितीय) तर ओम नम शिवाय महिला भजनी मंडळाने तृतीय क्रमांक मिळविला. तर उत्कृष्ट भजनी मंडळ म्हणून गायत्री, श्री गणेश, पद्मावती, घोराडेश्वर व दुर्गा माता या महिला भजनी मंडळांचा सन्मान करण्यात आला. परीक्षक म्हणून सुप्रसिद्ध स्वप्नील सूर्यवंशी, प्रदीप मोहिते यांनी काम पाहिले उत्कृष्ट गायक रमेश कांदळकर, उत्कृष्ट गायिका अनिता लोखंडे, उत्कृष्ट पखवाज वादक यश भालेराव यांचाही सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Kiw22b00923 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..