चिंचवड ते वाल्हेकरवाडी रस्ते ‘चकाचक’ लख्ख प्रकाशामुळे परदेशातील रस्त्यावर असल्याचा नागरिकांना अनुभव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिंचवड ते वाल्हेकरवाडी रस्ते ‘चकाचक’ 
लख्ख प्रकाशामुळे परदेशातील रस्त्यावर असल्याचा नागरिकांना अनुभव
चिंचवड ते वाल्हेकरवाडी रस्ते ‘चकाचक’ लख्ख प्रकाशामुळे परदेशातील रस्त्यावर असल्याचा नागरिकांना अनुभव

चिंचवड ते वाल्हेकरवाडी रस्ते ‘चकाचक’ लख्ख प्रकाशामुळे परदेशातील रस्त्यावर असल्याचा नागरिकांना अनुभव

sakal_logo
By

किवळे, ता. १२ : चिंचवडगाव सीमा हद्द ते वाल्हेकरवाडी रस्त्यावर महापालिकेच्या विद्युत विभागाच्यावतीने अर्बन स्ट्रीट डिझाईनप्रमाणे विद्युत दिवे बसवण्यात आले आहेत.
ब प्रभाग क्षेत्रीय कार्यालयाच्या विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता राजीव बटुले म्हणाले, ‘‘चिंचवडगाव ते वाल्हेकरवाडी रस्त्यावर दोन्ही बाजूच्या पदपथाच्या दुतर्फा एकूण २०० दिवे बसविण्यात येणार आहेत. यापैकी १०० दिवे बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. हे दिवे ३६ व्हॅटचे असून, पदपथावर लख्ख प्रकाश पडत असल्याने रात्रीच्या वेळी पदपथावरून ये-जा करणे
नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत सोईस्कर झाले आहे.
हे काम तीन महिन्यांपूर्वी सुरु झाले आहे. उर्वरित दिव्यांचे काम हे लवकरच मार्गी लागेल. दिसायला सुबक डिझाईनचे हे दिव्य असल्याने पदपथावरून ये- जा करताना नागरिकांना आपण परदेशातील रस्त्यांवर तर नाही ना असा भास होत आहे.

चिंचवडगाव ते वाल्हेकरवाडी रस्त्यावर बसविलेल्या या अर्बन स्ट्रीट डिझाईनच्या विद्युत दिव्यांमुळे वाल्हेकरवाडीच्या सौंदर्यात निश्चितच भर पडली असून, उर्वरित दिव्यांचे कामही लवकरच मार्गी लागेल.
- सचिन चिंचवडे, माजी नगरसेवक

या मार्गावर वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. दुसरीकडे दाट लोकवस्तीमुळे पहाटे आणि सायंकाळी फिरण्यास बाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे अर्बन स्ट्रीट डिझाईनच्या दिव्यांमुळे आधीपेक्षा प्रकाश जास्त असेल. त्यामुळे रात्रीच्या सुमारास एक सुरक्षित वातावरण राहील.
- दीपक वाल्हेकर,
भाजप पदाधिकारी, वाल्हेकरवाडी

अर्बन स्ट्रीट दिव्यांच्या कामामुळे वाल्हेकरवाडी भागात समाधानाचे वातावरण आहे. महापालिका विद्युत विभागाने उर्वरित कामही युद्ध पातळीवर प्राधान्याने पूर्ण करावे.
- ज्योती भालके, शिवसेना महिला आघाडी.

फोटोः 01777

Web Title: Todays Latest Marathi News Kiw22b00926 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..