देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरी कामगार पतसंस्थेतर्फे विद्यार्थ्यांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरी कामगार पतसंस्थेतर्फे विद्यार्थ्यांचा सत्कार
देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरी कामगार पतसंस्थेतर्फे विद्यार्थ्यांचा सत्कार

देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरी कामगार पतसंस्थेतर्फे विद्यार्थ्यांचा सत्कार

sakal_logo
By

देहू, ता.१७ : देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरी कामगार सहकारी पतसंस्थेच्या वतीने गुणी विद्यार्थी सन्मान सोहळा झाला. यावेळी भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार धनराज पिल्ले प्रमुख पाहुणे होते. याप्रसंगी ऑर्डनन्स फॅक्टरीचे महाप्रबंधक संजीव गुप्ता व पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर म्हस्के यांच्या हस्ते पिल्ले यांना ‘कृतज्ञता गौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. यावेळी माजी संचालक इंदुप्रकाश मेनन, पांडुरंग भोंडवे आदी उपस्थित होते. यावेळी ३११ गुणवंत विद्यार्थांना गौरविण्यात आले. संस्थेचे खजिनदार ज्योती गरड यांनी स्वागत केले. अध्यक्ष चंद्रशेखर म्हस्के यांनी प्रास्ताविक केले. सचिव सलीम शेख यांनी सूत्रसंचालन तर उपाध्यक्ष नीलेश धुमाळ यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kiw22b00936 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..