अष्टविनायक सहल उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अष्टविनायक सहल उत्साहात
अष्टविनायक सहल उत्साहात

अष्टविनायक सहल उत्साहात

sakal_logo
By

किवळे, ता.१५ : जिल्हा परिषदेच्या रावेत येथील प्राथमिक शाळेच्या (पूर्वीची) ३५ वर्षांपूर्वी इयत्ता ७ वी उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थी- विद्यार्थिनींची अष्टविनायक दर्शन सहल नुकतीच उत्साहात पार पडली.
या माजी विद्यार्थ्यांनी आपले तत्कालीन वर्गशिक्षक बसवेश्वर हैलकर यांना सहलीस नेले. प्रत्येक गणपती मंदिरात आपल्या सहकारी मित्रांच्या हस्ते आरती करण्यात आली. सहलीचे नियोजन नाष्टा, जेवण, मुक्कामाची उत्कृष्ट व्यवस्था केली होती. गणेश सोनटक्के यांनी संयोजन केले. त्यांना अनिता पाडळे, अनिता दारवटकर यांनी मदत केली.