रावेतला भुईमुगाचे चांगले उत्पन्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रावेतला भुईमुगाचे चांगले उत्पन्न
रावेतला भुईमुगाचे चांगले उत्पन्न

रावेतला भुईमुगाचे चांगले उत्पन्न

sakal_logo
By

किवळे, ता. २४ : रावेतला भुईमुगाच्या शेंगाचे यंदा चांगले उत्पन्न आल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. रावेत गावाचा समावेश पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत झाल्याने गृह संकुलांना मागणी वाढली आहे. परिणामी रावेत परिसरात गेल्या पाच वर्षात गृह संकुलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढून शेती खालील क्षेत्रात झपाट्याने घट झाली आहे.
पुढील पाच ते दहा वर्षात उरलीसुरली शेती काळाच्या पडद्याआड जाऊन रावेतची सुद्धा निगडी, आकुर्डी, पिंपरी, चिंचवड सारखी सिमेंटच्या जंगलाप्रमाणे अवस्था होणार आहे. मात्र अजून तरी ४० टक्के शेतजमीन शिल्लक असल्याने भुईमुगासह खरीप आणि रब्बी हंगामातील विविध पारंपरिक पिके घेण्यास शेतकरी प्राधान्य देत आहेत, असे पप्पू भोंडवे, मनोहर भोंडवे, शिवाजी भोंडवे, अलंकार भोंडवे, तानाजी भोंडवे, किरण भोंडवे, सचिन भोंडवे यांनी सांगितले.