रावेतला काकडा आरतीमुळे भक्तिमय वातावरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रावेतला काकडा आरतीमुळे 
भक्तिमय वातावरण
रावेतला काकडा आरतीमुळे भक्तिमय वातावरण

रावेतला काकडा आरतीमुळे भक्तिमय वातावरण

sakal_logo
By

किवळे, ता. २८ : रावेतगाव येथील काकडा आरती सोहळ्यामुळे गावात सध्या धार्मिक वातावरण दिसत आहे. या सोहळ्यात रोज सकाळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभाग घेत आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही कोजागिरी पौर्णिमेला काकडा आरतीची सुरुवात झाली. महिनाभर चालणाऱ्या या सोहळ्याची समाप्ती १० नोव्हेंबर पौर्णिमेला रामेश्वर महाराज इंगळे यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. बुधवारी दिवाळी पाडव्याच्या दिवशी पूजा, आरतीचा मान शिवाजी भोंडवे, पंडित भोंडवे, संभाजी भोंडवे, मनोहर भोंडवे, बाळू भोंडवे यांना मिळाला.
सकाळी झालेल्या भजनात भजनी मंडळाचे विजय भोंडवे, प्रकाश भोंडवे, रामदास भोंडवे, दत्तात्रेय भोंडवे, विकास पालेकर, नीलेश भोंडवे, संजय भोंडवे, तुकाराम सोनटक्के, शिवाजी भोंडवे, दत्तात्रेय शिंदे, कोंडीभाऊ भोंडवे, सुरेश भोंडवे, राजू भोंडवे, विठ्ठल भोंडवे, नंदकुमार भोंडवे, विजय भोंडवे तसेच शोभा भोंडवे, संगीता भोंडवे, सुषमा भोंडवे, आशा भोंडवे आणि विणेकरी पोपट भोंडवे यांनी सहभाग घेतला.