किवळेत बौद्ध समाजाच्या वतीने महाधम्मदेशनाचा कार्यक्रम उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किवळेत बौद्ध समाजाच्या वतीने 
महाधम्मदेशनाचा कार्यक्रम उत्साहात
किवळेत बौद्ध समाजाच्या वतीने महाधम्मदेशनाचा कार्यक्रम उत्साहात

किवळेत बौद्ध समाजाच्या वतीने महाधम्मदेशनाचा कार्यक्रम उत्साहात

sakal_logo
By

किवळे, ता. ३१ : विकासनगर येथील बौद्ध समाजाच्या वतीने महाधम्मदेशनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. भदन्त महाथेरो राजरतन यांचे प्रवचन झाले. आरपीआयचे बाळासाहेब भागवत यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. माजी नगरसेवक बाळासाहेब तरस यांनी दीप प्रज्ज्वलन करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. दिलीप कडलक यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक गोपाळ तंतरपाळे होते.
यावेळी भदन्त महाथेरो राजरतन म्हणाले, माणूस चांगल्या आचरणाने, चांगल्या वागण्याने स्वतःची, स्वतःच्या परिवाराची आणि समाजाचीही प्रगती करू शकतो. माणसाने धम्माचे विचार स्वतःमध्ये रूजवून त्याचे प्रामाणिकपणे आचरण केले आणि धम्म समजून घेतला तरच मानवी जीवनात धम्मक्रांती होईल.

यावेळी शुभांगी वानखडे, सिध्दार्थ चव्हाण, जी. आर. गायकवाड, श्रीमंत शिवशरण, अरुण जगताप, अशोक सोनवणे, श्याम सिंधवानी, विकास कडलक, सुनील कडलक, रंजना सोनवणे, प्रमिला तंतरपाळे, निर्मला चव्हाण, आदी धम्मबांधव उपस्थित होते. आयोजन धर्मपाल तंतरपाळे यांनी केले. बापूसाहेब गायकवाड यांनी सूत्रसंचालन तर सिंधूताई तंतरपाळे यांनी आभार मानले.