Mon, Jan 30, 2023

शांताराम भोंडवे यांना समाज रत्न पुरस्कार
शांताराम भोंडवे यांना समाज रत्न पुरस्कार
Published on : 13 December 2022, 10:57 am
किवळे, ता. १३ : आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून ह्यूमन सोशल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या वतीने रावेत येथील सामाजिक कार्यकर्ते शांताराम भोंडवे यांना समाज रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पिंपळे गुरव येथील नाट्यसम्राट निळू फुले नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात माजी जिल्हाधिकारी ई झेड खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली व माजी निवृत्त न्यायाधीश सीएम चोंदते, सकाळ समूहाचे संदीप काळे, लिज्जत पापडचे संचालक सुरेश खोत यांच्या उपस्थितीत भोंडवे यांचा गौरव करण्यात आला.