‘बापदेव महाराज पुलाखाली एकेरी वाहतुकीची गरज’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘बापदेव महाराज पुलाखाली 
एकेरी वाहतुकीची गरज’
‘बापदेव महाराज पुलाखाली एकेरी वाहतुकीची गरज’

‘बापदेव महाराज पुलाखाली एकेरी वाहतुकीची गरज’

sakal_logo
By

किवळे, ता. १४ : परिसरात वाढलेले व्यवसाय तसेच वाढत असलेल्या फ्लॅट धारकांच्या संख्येमुळे किवळे येथील बापदेव महाराज पुलाखाली दैनंदिन वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याठिकाणी रोजच वाहतूक कोंडीचे चित्र असून यावर मार्ग काढण्यासाठी बापदेव महाराज पूल ते पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग यादरम्यान एकेरी वाहतूक करण्याची मागणी किवळे वासियांनी केली आहे.

बापदेव महाराज पुलाखाली कात्रज, रावेत, किवळेगाव, देहूरोड, विकासनगर, आदर्शनगर, मामुर्डी, गहुंजे, सांगवडे आणि आसपासच्या गावातून येणाऱ्या वाहनांचा संगम होतो. याठिकाणी वाहतूक पोलिस कमी प्रमाणात दिसून येतात. त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली असून या कोंडीत अडकून पडावे लागत असल्याने स्थानिक आणि बाहेरच्या अशा सर्वच वाहनचालकांची गैरसोय होत आहे.
यावर उपयोजना म्हणून देहूरोड आणि रावेत पोलिस ठाणे वाहतूक विभागाने संयुक्तपणे बापदेव महाराज पूल मार्गे पुढे द्रुतगती महामार्ग यादरम्यान एकेरी वाहतूक करण्याची मागणी शिवसेना विभाग समन्वयक तुषार तरस यांनी केली आहे. एकेरी वाहतूक केल्यास पश्चिमेकडील किवळे, मामुर्डी, गहूंजेकडून येणारी वाहतूक किवळे गावठाण, कोतवालनगर आणि कातळे वस्ती मार्गे वळविण्यात यावी, असेही स्थानिक नागरिकांनी सुचविले आहे.

फोटो ओळ kiw14002p1 :
किवळे ः काही बेशिस्त वाहन चालक आणि वाहतूक पोलिसांचा अभाव यामुळे बापदेव महाराज पुलाखाली वाहतुकीची कोंडी होत आहे.