श्री धर्मराज महाराज यात्रा रावेतला उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्री धर्मराज महाराज यात्रा रावेतला उत्साहात
श्री धर्मराज महाराज यात्रा रावेतला उत्साहात

श्री धर्मराज महाराज यात्रा रावेतला उत्साहात

sakal_logo
By

किवळे, ता. २८ : रावेतचे ग्रामदैवत श्री धर्मराज महाराज उत्सवाचे समस्त गावकरी मंडळ आणि श्री धर्मराज उत्सव समितीच्यावतीने धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अभिषेक पूजा व आंबिल बीज, छबिना, ढोल, लेझीम व श्रींची मिरवणूक, मंगला बनसोडे सह नितीनकुमार बनसोडे यांचा लोकनाट्य तमाशा झाला.
तसेच कुस्त्यांच्या जंगी आखाड्यात पंचक्रोशीतील पैलवानांनी सहभाग घेऊन कुस्तीचे मैदान मारले. उत्सव समितीच्यावतीने रोख बक्षीस देऊन त्यांचा सत्कारही करण्यात आला. अखंड हरिनाम सप्ताहात काकड आरती, गाथा भजन, हरिपाठ, कीर्तन झाले.

कार्यक्रमाचे संयोजन संत तुकाराम कारखान्याचे संचालक मधुकर भोंडवे, बाळकृष्ण भोंडवे पाटील, माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, मनोहर भोंडवे, तानाजी भोंडवे, संदीप भोंडवे, सागर भोंडवे, दिवानजी भोंडवे, नंदकुमार भोंडवे, बाळासाहेब भोंडवे, गणेश भोंडवे, मामा भोंडवे, योगेश शिंदे, सुरेश भोंडवे, अनिल भोंडवे, राम भोंडवे, तुषार भोंडवे, दौलत भोंडवे, शांताराम भोंडवे, सुनील भोंडवे, यांनी केले.
महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे, पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे यांचा सत्कार करण्यात आला. नरेंद्र सोनटक्के, विजय भोंडवे, दीपक भोंडवे यांनी सूत्रसंचालन केले.