वॉव किड्स ग्लोबल चॅम्पचे स्नेहसंमेलन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वॉव किड्स ग्लोबल चॅम्पचे 
स्नेहसंमेलन उत्साहात
वॉव किड्स ग्लोबल चॅम्पचे स्नेहसंमेलन उत्साहात

वॉव किड्स ग्लोबल चॅम्पचे स्नेहसंमेलन उत्साहात

sakal_logo
By

पिंपरी, ता. ७ : वाकड येथील वॉव किड्स ग्लोबल चॅम्प स्कूलचे स्नेहसंमेलन नवी सांगवी येथील निळू फुले नाट्यगृहात रविवारी (ता. ५) उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षतेस्थानी फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ ब्रेनवर्डच्या रेशु अग्रवाल तर प्रमुख पाहुणे म्हणून सरबनी ॲकॅडमीच्या भरत नाट्यम नृत्यांगना सरबनी घोष होत्या. या वेळी इंटरनॅशनल रेडियन्स स्कूल मुख्याध्यापिका मेरी देवदास, सर्कल हेड ऑफ मिड ब्रेन ॲक्टिव्हिटीचे जितेंद्र बोरा, मुख्याध्यापिका विनिता पाटील-हाळे, संचालक उमाकांत हाळे, ॲड. सोनिया बकवाड आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी गणेश वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात केली. पंजाबी नृत्य, कोळी नृत्य, भरत नाट्यम नृत्य, झाडे लावा झाडे जगवा हे लघु नाट्य आदी विविध कलांचे सादरीकरण केले गेले. शुभांगी देशमुख, आरुष हाळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाची संकल्पना मुख्याध्यापिका विनिता पाटील-हाळे यांची होती.

kiw6002p1 :