
ज्वारीचे एक एकर क्षेत्र पक्षांसाठी राखीव
किवळे, ता. २८ : रावेत येथील संत तुकाराम कारखान्याचे संचालक मधुकर भोंडवे यांनी ज्वारीचे एक एकर क्षेत्र पक्षांसाठी राखीव ठेवले आहे. त्यामुळे पक्षांसाठी अन्नाची सोय झाली आहे.
रावेत येथे पवना नदीजवळ गावठाणाकडे जाणाऱ्या रस्त्यावर भोंडवे यांची शेतजमीन आहे. परिसरात सुमारे ७५ टक्के क्षेत्रावर नागरीकरण झाल्याने शेतीखालील क्षेत्र झपाट्याने कमी झाले आहे, तरीही बहुतेक शेतकरी पारंपरिक पद्धतीने कुठे बागायती क्षेत्र तर कुठे कोरडवाहू पद्धतीने जमीन कसत आहेत.
भोंडवे म्हणाले, अडीच महिन्यापूर्वी एक एकर मध्ये ज्वारीची पेरणी केली. आता ज्वारी पूर्णतः निसवली आहे, मात्र कणसे असून फुलोऱ्यावर आहेत. इतर शेतकऱ्यांकडून कणसांची पक्षापासून बचावासाठी राखण केली जाते. घरी वैभव ऐश्वर्या संपत्तीचा वास असल्याने आर्थिक दृष्ट्या शेतीतील उत्पन्नावर अवलंबून नाही. त्यामुळे निसर्गातील पक्षांशी बांधिलकी या जाणिवेतून ज्वारीचे हे क्षेत्र पक्षांसाठी राखीव ठेवले आहे.
kiw28001p1: