बरलोटा मेमोरिअल विस्डमध्ये महिलांचा सत्कार

बरलोटा मेमोरिअल विस्डमध्ये महिलांचा सत्कार

किवळे, ता. १० : विकासनगर येथील साऊथ इंडियन असोसिएशन्सच्या एच ए बरलोटा मेमोरिअल विस्डम इंग्लिश मीडियम हायस्कूल (साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी संचलित) मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा झाला. सिम्बॉयसिस कॉलेजच्या प्राचार्य भावना सिंगगोजू प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये मुख्याध्यापिका पद्मजादेवी विडप, डॉ. वरदा कुलकर्णी, ॲड. नीलिमा वर्तक, व्हिक्टोरिया नाडार, सारिका नाईकनवरे, प्रज्ञा खानोलकर, शैला नरवाल, अर्चना बिजेश, उज्ज्वला जाधव, सिंधू तंतरपाळे, विजयलक्ष्मी रेड्डी, संजना साबू आणि तुकाराम भोंडवे, राजेंद्र तरस, नीलेश तरस, धर्मपाल तंतरपाळे यांचा सत्कार झाला. यावेळी अध्यक्ष जयशंकर जयसिंग, पार्वती बाबू, मुरलीधर नायडू, जेकब नाडार, के. के. पिल्ले, ए. के प्रेमचंद्रन, व्यंकटेश ओलारी विश्वस्तएस. डेव्हिड नाडार, टी ख्रिस्तोफर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com