Thur, March 23, 2023

श्रेयांस पारस याला ‘इव्हेंट मॅनेजर ऑफ द इयर’ पुरस्कार
श्रेयांस पारस याला ‘इव्हेंट मॅनेजर ऑफ द इयर’ पुरस्कार
Published on : 11 March 2023, 10:45 am
पिंपरी, ता. ११ : एनआयईएम द इन्स्टिट्यूट ऑफ इव्हेंट मॅनेजमेंटच्या वतीने श्रेयांस पारस मुथा याचा ‘इव्हेंट मॅनेजर ऑफ द इयर’ या पुरस्काराने गौरव करण्यात आला. यावेळी एनआयईएम द इन्स्टिट्यूट ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट डीन आणि डायरेक्टर डॉ. होशी भिवंडीवाला, अभिनेते सौरभ गोखले, आराधना शर्मा, पियुष मल्होत्रा उपस्थित होते. श्रेयांसने डॉ. अरविंद व तेलंग कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स ॲन्ड सायन्स, निगडीचे या पुरस्काराबद्दल आभार मानले आहेत.