Thur, March 23, 2023

शिंदेवस्ती येथील
वीजपुरवठा खंडित
शिंदेवस्ती येथील वीजपुरवठा खंडित
Published on : 17 March 2023, 2:12 am
किवळे : रावेत येथील शिंदेवस्ती परिसरात सायंकाळच्या सुमारास तब्बल दोन तास वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे हाल झाले. शिंदेवस्ती येथे बीआरटी ते रेल्वे लाइन दरम्यान व्यावसायिक दुकाने मोठ्या संख्येने आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्याने व्यावसायिकांसह उकाड्याने त्रस्त झालेल्या रहिवाशांचे हाल झाले. साडेसातपर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता, असे संभाजी भोंडवे, बाळकृष्ण भोंडवे, मनोहर भोंडवे यांनी सांगितले.