सांगवडे येथील सिमेंट रस्त्याला भेगा
पवना नदीवरील अरुंद पुलावरून धोकादायक वाहतूक सुरू

सांगवडे येथील सिमेंट रस्त्याला भेगा पवना नदीवरील अरुंद पुलावरून धोकादायक वाहतूक सुरू

किवळे, ता. ३० : सांगवडे ते मामुर्डी पवना नदीवरील पुलादरम्यानच्या सिमेंट रस्त्यावर काही ठिकाणी भेगा पडल्या असून, त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
उन्हाचा तडाखा आणि येत्या पावसाळ्यात या भेगा अजून मोठ्या होण्याची शक्यता असल्याने रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी बाबासाहेब आवटी, तुषार जगताप, योगेश राक्षे, संतोष राक्षे यांनी केली आहे.
सांगवडे ते मामुर्डी मार्गावर पवना नदीवर स्मशानभूमीजवळ जुना पूल आहे. सावित्री नदीवरील पूल कोसळल्यानंतर या अरुंद पुलाचा प्रश्न ऐरणीवर आला होता.
या पुलाजवळ पर्यायी पूल बांधण्याच्या दृष्टीने सांगवडेवासियांनी शासनाकडे मागणी केली आहे. मात्र अजून ती गुलदस्त्यात आहे.
सांगवडेसह परिसरातील गावांची वाहतूक या अरुंद पुलावरून होत असते. सिमेंट रस्ता अरुंद आणि नदीवरील पूलही अरुंद असल्याने बऱ्याचदा वाहतुकीची कोंडी होते. सिमेंटचा रस्ता शेतजमिनीपासून ७ ते ८ फूट उंच असल्याने काही वाहने घसरण्याचे प्रकार घडले आहेत. याकडे बाबासाहेब आवटी यांनी लक्ष वेधले.

सांगावडे- मामुर्डी रस्त्यावरील पूल हा फक्त पादचारी व दुचाकी वाहनांसाठी आहे. कृपया चारचाकी वाहन पुलावरून नेऊ नये, ते धोक्याचे आहे.
कार्यकारी अभियंता बांधकाम (उत्तर), असा बोर्ड लावण्यात आला आहे.
परंतु स्थानिक सांगावडे, साळुंब्रे, दारूंब्रेकरांना शहरी भागात जाण्यासाठी या पुलामार्गे एकमेव जवळचा रस्ता असल्याने सध्या दुचाकीसह चार चाकी वाहन चालक जीव धोक्यात घालून या पुलावरून येजा करीत असतात. त्यामुळे स्थानिक आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून पवना नदीवरील या जुन्या पुलास समांतर अथवा जुन्या पुलाच्या ठिकाणी नव्या रुंद फुलाची उभारणी लवकर व्हावी, अशी मागणी येथील पंचक्रोशीतील ग्रामस्थांची असल्याचे बाबासाहेब आवटी यांनी सांगितले.

फोटो ः
सांगवडे ते मामुर्डी सिमेंट रस्त्यावर पडलेल्या भेगा. (दुसऱ्या छायाचित्रात) पवना नदीवरील अरुंद व धोकादायक पुलावरून मोटारींची वाहतूक सुरू आहे.
02212, 02213, 02214

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com