Sun, June 4, 2023

श्रीराम नवमीनिमित्त किवळेतील राम मंदिरात भाविकांची गर्दी
श्रीराम नवमीनिमित्त किवळेतील राम मंदिरात भाविकांची गर्दी
Published on : 30 March 2023, 2:15 am
किवळेतील मंदिरात भाविकांची गर्दी
किवळे ः श्रीराम नवमीनिमित्त किवळेतील राम मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती, तसेच विकासनगर, रावेत, पुनावळे येथील राम मंदिरांमध्येही भाविकांची गर्दी होती. मराठी शाळेजवळील श्रीराम मंदिरात पूजा व अभिषेक, बापदेव महाराज भजनी मंडळाचे भजन आदी कार्यक्रम झाले. दर्शनासह महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला. शिवसेनेचे शहर प्रमुख नीलेश तरस, संकल्प सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष बापू कातळे, रावेत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे, अविनाश पाखरे, जिग्नेश राठोड, किरण धुमाळ, बाळासाहेब तरस आदींनी भेट देऊन दर्शन घेतले. गणेश दांगट, मारुती दांगट, वैशाली दांगट, सारिका दांगट, पोपट म्हसूडगे, रामभाऊ दवणे, प्रज्वल साखरे, अनिता लोखंडे, चंद्रकांत आमले यांनी संयोजन केले.