रावेत, किवळेला होर्डिंगचा धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रावेत, किवळेला होर्डिंगचा धोका
रावेत, किवळेला होर्डिंगचा धोका

रावेत, किवळेला होर्डिंगचा धोका

sakal_logo
By

किवळे ः किवळेतील दुर्घटनेमुळे रावेत आणि किवळे परिसरातील नागरिकांसाठी होर्डिंगचा धोका निर्माण झाले आहे. परिसरात टोलेजंग होर्डिंग उभारून जाहिराती केल्या जात आहेत. बीआरटी मार्गावर एमआयडीसी पंपिंग स्टेशनजवळ भोंडवे चौकात वाहतूक दिव्यांच्या दुतर्फा होर्डिंग आहेत. गृहप्रकल्प, वाढदिवस, अभिनंदन अशा जाहिराती झळकत आहेत. होर्डिंगचा जमिनीतील पाया व उंची नियमानुसार आहे का? याकडे नागरिकांनी लक्ष वेधले. किवळे येथील मुकाई चौकात अर्धा डझनपेक्षा जास्त टोलेजंग होर्डिंग उभारले आहेत. त्यालगत व त्याखाली खाद्यपदार्थांच्या गाड्या असतात. त्यावर खवय्यांची गर्दी असते. त्यांच्या जीवाला धोका संभवतो.

रावेतला पंपिंग स्टेशनजवळ रस्त्यापासून दहा फूट अंतरावरच होर्डिंगची संख्या अधिक आहे. यात काही खूप मोठे असून अपघात संभवतो.
- संजय पालेकर, रावेत

होर्डिंगचा विषय न्यायप्रविष्ट आहे. तरीही अधिकृत व अनधिकृत होर्डिंग किती, कोणते व कोणाचे याबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा आहे.
- धनंजय भोंडवे, रावेत

मृत्यूसारख्या घटना टाळण्यासाठी नियमानुसारच होर्डिंग उभारणी व्हायला हवी. सांगाड्याचा पाया दहा-पंधरा फूट खोल हवा व स्टील चांगल्या दर्जाचे हवे.
- जगदीश शेट्टी, हॉटेल व्यावसायिक, किवळे

--