महाविद्यालय इमारत निधीसाठी
मावळातील पालक वेठीस

महाविद्यालय इमारत निधीसाठी मावळातील पालक वेठीस

पिंपरी, ता. २४ ः मावळ तालुक्यातील अनुदानित महाविद्यालयांमध्ये बारावी प्रवेश प्रक्रियेत इमारत निधीच्या नावाखाली पालकांना वेठीस धरले जात आहे.
शिक्षण उपसंचालकांनी या प्रश्नी लक्ष घालून, संबंधित महाविद्यालयाला समज द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकांकडून करण्यात येत आहे.
एक महिन्यापूर्वी अकरावीचा रिझल्ट लागल्यानंतर १५ मे पर्यंत मावळ तालुक्यातील तळेगावसह अन्य शहरांमध्ये बारावी प्रवेशासाठी पालकांची झुंबड उडाली होती. अनुदानित महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी लागणारे नाममात्र शुल्क वगळता अतिरिक्त पैशाचा संबंध नसताना इमारत बांधकाम निधीच्या नावाखाली या पालकांकडून दहा हजारांपासून ३५ हजारांपर्यंत इमारत निधी वसूल केली जात आहे. त्यानंतरच प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जात असल्याचे पालकांनी सांगितले.
कर्ज काढून वा पाहुणे मंडळी यांच्याकडून उसनवार घेऊन पालकांनी रक्कम भरून प्रवेश प्रक्रिया करून घेतली. त्यामुळे पालकांमध्ये संबंधित महाविद्यालयांवरील संचालक मंडळाबद्दल नाराजीची भावना आहे.
दरम्यान, शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

‘‘अनुदानित महाविद्यालयात जादा शुल्क असणे शक्य नाही. पालक आणि विद्यार्थी यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन संबंधित महाविद्यालय प्रशासन हे विद्यार्थी आणि पालकांची आर्थिक लूट करत आहे. पालक आणि विद्यार्थ्यांनी जागरूक होऊन शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार केल्यास त्यांना नक्कीच न्याय मिळेल.
सुरेश खुर्पे, उपाध्यक्ष, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस

‘‘जे काही प्रवेश शुल्क शासनाने ठरवून दिलेले आहे, तेच संबंधित महाविद्यालयांनी घेणे अपेक्षित असते. अतिरिक्त शुल्क घेतले जात असेल तर ते बेकायदा आहे. शिक्षक- पालक समितीमध्ये जे शुल्क ठरलेले असते, तेच घेणे बंधनकारक असते.
- अमरसिंग हिरे, माहिती अधिकार कार्यकर्ते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com