पंडित नेहरू विद्यालयात संभाजी महाराज जयंती उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंडित नेहरू विद्यालयात 
संभाजी महाराज जयंती उत्साहात
पंडित नेहरू विद्यालयात संभाजी महाराज जयंती उत्साहात

पंडित नेहरू विद्यालयात संभाजी महाराज जयंती उत्साहात

sakal_logo
By

कामशेत, ता. १५ ः पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे पंडित नेहरू विद्यालयात छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्राचार्य आजिनाथ ओगले यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी विद्यालयाचा माजी विद्यार्थी सचिन शेडगे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याविषयी माहिती मनोगतातून व्यक्त करताना म्हटले, छत्रपती संभाजी महाराजांचे वर्णन इतिहासात शूर, पराक्रमी, स्वराज्यरक्षक आणि निधड्या छातीचा योद्धा अशी केली जाते. छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले पुत्र. त्यांनी शिवरायांनंतर स्वराज्याची तलवार एक हाती पेलली. सह्याद्री प्रतिष्ठान मावळच्या वतीने संभाजी महाराजांच्या चरित्रावरील ऐतिहासिक पुस्तके विद्यालयाच्या ग्रंथालयास भेट दिली. सह्याद्री प्रतिष्ठानचे किशोर वाघमारे, अंकुश काटकर, केदार डाखवे, राजू शिंदे, आश्विन दाभाडे, चेतन वाघमारे, विलास भोसले व शिक्षकेतर कर्मचारीवृंद उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kjg22b00328 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top