वंचित महिला आघाडीचा पोलिस स्टेशनवर मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वंचित महिला आघाडीचा
पोलिस स्टेशनवर मोर्चा
वंचित महिला आघाडीचा पोलिस स्टेशनवर मोर्चा

वंचित महिला आघाडीचा पोलिस स्टेशनवर मोर्चा

sakal_logo
By

कामशेत, ता. १० ः कामशेत पोलिस स्टेशनच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होऊनही आरोपी अमर चौरे अद्याप फरार असल्याने आरोपीला त्वरित अटक करण्यात यावी. यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या महिलांनी पोलिस स्टेशनवर ठिय्या आंदोलन केले.
यावेळी पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी आरोपीला लवकरात लवकर अटक करतो, असे आश्वासन दिले. तसेच अमर चौरे ही व्यक्ती कोणाला आढळल्यास त्वरित पोलिस स्टेशनला कळवा, असेही सांगितले. या आंदोलनात वंचित बहुजन महिला आघाडीच्या सारिका सिंग, जयश्री सदावर्ते, अनिता गायकवाड, वृषाली वीरगुजर, मनीषा ओव्हाळ, अनिता सावले, अलका कांबळे, सुनीता कदम, कल्पना पवार, कीर्ती शिंदे, पुष्पा वाघमारे, पुनम कांबळे, अंजली रणपिसे तसेच तालुका कार्यकारिणी प्रवक्ते कैलास साबळे, राजेंद्र कांबळे, दत्ता शिंदे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kjg22b00341 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top