नाणे मावळात भात लागवडीला वेग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाणे मावळात भात लागवडीला वेग
नाणे मावळात भात लागवडीला वेग

नाणे मावळात भात लागवडीला वेग

sakal_logo
By

भात लागवडीला वेग
कामशेत ः साथ झाल्यानंतर व संततधार पावसामुळे नाणे मावळात भात लावणीला सुरुवात करण्यात आली. त्यासाठी बळिराजाची लगबग सुरू आहे. पारंपरिक पद्धतीने रूढ असलेली साथ झाल्याशिवाय भात लावणीला सुरवात केली जात नाही.
नाणे मावळातील काही गावांनी रविवारी तर काही गावांनी मंगळवारी साथ केली. उर्वरित गावे येत्या शुक्रवारी साथ करून भात लावणीला सुरुवात करतील. ग्रामदैवताला नैवेद्य दाखवून श्रीफळ फोडून साथ केली जाते.
सध्या समाधानकारक पाऊस पडतो आहे. त्यात शेतकरी पारंपरिक पद्धतीने भात लावणीसह आधुनिक पद्धतीने लावणी करीत आहेत. कोळंबा या जुन्या भात वाणापेक्षा इंद्रायणी, सोनम, समृद्धी या वाणांना शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. बैलजोडीने लावणीसाठी चिखल करण्याचे प्रमाण कमी झाले असून, यंत्राच्या मदतीने चिखल केली जात आहे. यंत्राच्या मदतीने भात लावणीचे नवे तंत्र शेतकरी स्वीकारत असल्याचे करंजगाव येथील प्रगतशील शेतकरी राजेश टाकवे, मंगेश कुढले, बाळासाहेब गायकवाड आदी शेतकऱ्यांनी सांगितले. बासमती तांदळासाठी योग्य गिरणी उपलब्ध नसल्याने मावळातील शेतकऱ्यांना इच्छा असूनही बासमतीचे पीक घेता येत नाही.-

फोटोः 00817

Web Title: Todays Latest Marathi News Kjg22b00363 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..