कातकरी समाजाचे शेतीच्या दिशेने पाऊल शिकारी हळूहळू होतेय बंद; मजुरांच्या प्रश्नांवर अर्धलेणी-बटई शेतीला प्राधान्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कातकरी समाजाचे शेतीच्या दिशेने पाऊल

शिकारी हळूहळू होतेय बंद; मजुरांच्या प्रश्नांवर अर्धलेणी-बटई शेतीला प्राधान्य
कातकरी समाजाचे शेतीच्या दिशेने पाऊल शिकारी हळूहळू होतेय बंद; मजुरांच्या प्रश्नांवर अर्धलेणी-बटई शेतीला प्राधान्य

कातकरी समाजाचे शेतीच्या दिशेने पाऊल शिकारी हळूहळू होतेय बंद; मजुरांच्या प्रश्नांवर अर्धलेणी-बटई शेतीला प्राधान्य

sakal_logo
By

कामशेत, ता. ८ ः मावळ तालुका हा डोंगराळ आणि वेगवेगळ्या आदिवासींची वस्ती आहे. तालुक्यात शेकडो वर्षांपासून कातकरी हा आदिवासी समाज सह्याद्रीच्या कुशीत आपले नैसर्गिक जीवन जगत आहेत. मात्र, आता हाच आदिवासी समाज शिकारीकडून हळूहळू शेतीकडे वळू लागला आहे.
गेल्या १०-२० वर्षांपासून दळणवळणांच्या साधनांमुळे त्यांच्या नागरीवस्तीशी संबंध येऊ लागला. त्यामुळे त्यांच्या विचारसरणीत,
राहणीमानात, दृष्टिकोनात बदल दिसू लागला आहे. परंतु, अशा परिस्थितीतही मागच्या पिढीतील अनेकांनी तालुक्याचे गाव पाहिलेले
नाही. सरकारी योजना व मिळणाऱ्या अनुदानामुळे त्यांना अन्न, वस्त्र, निवारा, औषधोपचार, मुलांचे शिक्षण आदी सुविधा मिळू लागल्या आहेत. त्यामुळे पुर्वीपेक्षा जीवनस्तर निश्चितच उंचावला आहे. पण, ज्या कुंटुबात अजूनही कोणी शिकलेले नाही. त्यांच्या जीवनमानात फारसा फरक नाही.

शेतकरी अन् कातकरी यांची सांगड

ज्या शेतकऱ्यांना इतर कामधंद्यामुळे शेतीकडे पूर्ण लक्ष देता येत नाही. तसेच ज्यांना मनुष्यबळ कमी आणि शेती जास्त आहे, अशा शेतकऱ्यांनी कातकरी बांधवांशी विचारविनिमय करून एकत्रित शेतीची कामेसुरू केली आहेत. काही शेतकऱ्यांनी थेट कातकरी समाजातील कष्टाळू कुटुंबांना भातशेती अर्धलेणी पद्धतीने देत आहेत. यामध्ये मनुष्यबळ कातकरी बांधवांचे तर शेती, आर्थिक भांडवल, अवजारे, खतं व बी-बियाणे ही शेतकऱ्यांची असतात. उत्पादनातील धान्य दोघांत अर्धे-अर्धे वाटून घेतात. मिळणारी वैरण शेतकऱ्यांच्या जनावरांना मिळते. त्यामुळे एकमेकांची गरज पूर्ण होते, अशी माहिती करंजगावचे दत्ता वाघमारे, नारायण वाघमारे, रामदास वाघमारे यांनी दिली.


मजुरी करून मिळालेल्या पैशाने धान्य विकत घेण्यापेक्षा थोडं जास्त काम केलं तर वर्षभराचे
भात मिळते. त्यामुळे नंतरच्या मजुरीचे पैसे वेगळ्या कामाला पुरवता येते.
- संतोष वाघमारे, कातकरी समाजातील तरुण

शेतीत उत्पन्नापेक्षा खर्च वाढला आहे. सध्या मिळणाऱ्या दराने शेतकऱ्यांचा लागवड खर्च निघणे अवघड झाले आहे. आधीच
शेतकऱ्यांच्या डोक्यावर बँकांचे तसेच सावकाराचे कर्ज आहे. या कर्जाची परतफेड कशी करायची, असा प्रश्नही शेतकऱ्यांसमोर उभा
ठाकला आहे. परंतु, शेतकऱ्यांना शेतीशिवाय पर्याय उरला नाही. शेती करायची म्हटले तर मजुरांची आवश्यकता आहे. त्यासाठी गावात मजूर
मिळत नाही. बाहेरून मजूर आणावे लागत आहे. त्यांना ये-जासाठी ऑटो खर्चही द्यावा लागत असल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. त्यापेक्षा अर्धलेणी शेती योग्य वाटू लागली आहे, असे कामशेतमधील शेतकरी संतोष शिंदे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kjg22b00364 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..