स्मशानभूमी परिसर ठरतोय कोंडीचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्मशानभूमी परिसर ठरतोय कोंडीचा
स्मशानभूमी परिसर ठरतोय कोंडीचा

स्मशानभूमी परिसर ठरतोय कोंडीचा

sakal_logo
By

कामशेत, ता. २० ः कामशेत-नाणे रस्त्यावर इंद्रायणी नदीकाठावर दोन्ही बाजूला नाणे व कामशेत गावांची स्मशानभूमी आहे. दोन्ही गावांच्या स्मशानभूमीला पुरेशी जागा उपलब्ध नाही, अंत्यविधी व दशक्रिया विधी दरम्यान शेकडो लोकांची गर्दी होत असते. या वेळी पार्किंगसाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने आलेले नातेवाईक हे रस्त्यावर व पुलावर चुकीच्या पद्धतीने गाडी पार्किंग करतात. कधी कधी या गाड्यांची संख्या शेकडो असते. त्यामुळे कामशेत-उकसाण, कामशेत-जांभवली या रस्त्यावरून जाणारे प्रवासी यामध्ये कामगार, विद्यार्थी, पस्तीस गावातील शाळेतील शिक्षक-शिक्षिका या सर्वांचा समावेश असतो. यामुळे दशक्रिया ज्या दिवशी असेल त्या दिवशी नाणे मावळातील प्रत्येक शाळेतील शिक्षक शाळेत उशिरा पोचतात. अनेक विद्यार्थ्यांची कामशेतची बस, रेल्वे चुकते. कामगारांना कामावर वेळेवर जात येत नाही. याशिवाय झालेली गर्दी रहदारी सुरळीत करण्यासाठी तब्बल दोन ते तीन तास जातात.

श्रद्धांजली देण्याचा ट्रेंड
नाणे मावळात अंत्यविधी व दशक्रिया विधीच्या वेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित नेत्यांच्या माध्यमातून श्रद्धांजली देण्याचा प्रमाण ट्रेंड वाढत चाललेला आहे. जवळपास प्रत्येक कार्यक्रमाला कमीत कमी पाच लोक आपल्या भाषणातून श्रद्धांजली देतात. यामध्ये साधारण सरासरी तासभर वेळ जातो. या बदललेल्या ट्रेंडमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो


निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे समस्या गंभीर
कामशेत-नाणे रस्ता हा अत्यंत खराब झाला आहे. त्यात नदीपासून जवळपास एक किलोमीटर मातीचा भराव टाकून रस्ता उंच करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु ते काम अपूर्ण अवस्थेत व कामाचा दर्जा निकृष्ट असल्याने दशक्रियाच्या वेळी रस्त्यावरची वाहतूक कोंडी अधिकच वाढत चालली आहे.

अंत्यविधी व दशक्रिया विधीच्या दिवशी संबंधित कुटुंबांनी किंवा ग्रामस्थांनी रस्त्यावरची वाहतूक कोंडी होणार नाही व वाहतूक सुरळीत राहावी, या हेतूने वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करावे.
- बापूराव नवले, मुख्याध्यापक, करंजगाव

हा प्रश्न नेहमीच उद्भवत असतो. भविष्यात एखाद्या रुग्णाला किंवा गर्भवती महिलेला दवाखान्यात नेण्याच्या प्रसंगी ही समस्या किती गंभीर आहे, हे निदर्शनास येऊ शकते. त्यामुळे आम्ही ग्रामस्थ येथून पुढे ग्रामपंचायत किंवा संबंधित कुटुंबाच्या माध्यमातून वाहतूक सुरळीत राहील, या हेतूने स्वयंसेवक नेमण्याचे काम करणार आहोत.
- मारुती शेटे, माजी सरपंच नाणे

Web Title: Todays Latest Marathi News Kjg22b00378 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top