
कामशेत उकसान रस्त्याला दोन महिन्यांतच पडले खड्डे साइडपट्ट्या वाहून गेल्याने पादचाऱ्यांची कसरत
कामशेत, ता. २२ ः कामशेत उकसान व कामशेत जांभवली या रस्त्याचे मे- जून दरम्यान नूतनीकरणाचे काम झाले होते. रस्त्याचे काम सुरू असतानाच रिमझिम पावसाला सुरवात झाली होती. त्यानंतर नाणे मावळात मुसळधार पाऊस बरसला. योग्य वेळेत काम न झाल्याने हे काम पावसाळ्यात तग धरू शकले नाही. त्यामुळे या रस्त्यावर दोनच महिन्यात खड्डे पडू लागले आहेत. कांबरे गावाच्या हद्दीत एके ठिकाणी रस्ता खचला आहे. तसेच नाणे करंजगाव व गोवित्री आदी ठिकाणी रस्त्यांच्या साईड पट्ट्या वाहून गेल्या आहेत. साईड व त्यांच्या कामकाजावेळी अनेक ठिकाणी मुरूम वापरण्याऐवजी रस्त्याचे माती टाकण्याचे काम झाले, असा आरोप नाणे मावळातील प्रवासी करतात. याबाबत बोलताना सुदाम गायकवाड, प्रतीक शेडगे म्हणाले, ‘‘दोनच महिन्यात रस्त्याची अशी अवस्था झाल्याने भविष्यात हा रस्ता अत्यंत खराब होण्याची शक्यता आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी वेळेत दर्जेदार रस्ता केला पाहिजे.’’
छायाचित्र
कामशेत ः रस्त्याची झालेली दुरवस्था.
Web Title: Todays Latest Marathi News Kjg22b00379 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..