नाणे मावळात सांस्कृतिक कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाणे मावळात सांस्कृतिक कार्यक्रम
नाणे मावळात सांस्कृतिक कार्यक्रम

नाणे मावळात सांस्कृतिक कार्यक्रम

sakal_logo
By

कामशेत ः गोल्डन ग्लेड्स माध्यमिक विद्यालयात संस्थेचे सचिव विजय टाकवे यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात आली. शिवाजी टाकवे, बापूराव नवले, दिनकर सातकर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. सूत्रसंचालन अशोक वाडेकर यांनी केले. गोवित्रीमध्ये सकाळी विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढली. योगेश केदारी यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. अजित मोरे व सुनील बोधडे व खंडू घोटकुले यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. कांब्रे येथे वनिता काटकर यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन झाले. तालुका स्तरावर झालेल्या स्पर्धेतील विजेत्यांना अडीच हजार रुपयांची लीप फॉरवर्ड पुस्तके देण्यात आली. सांगिसे येथील बोधिसत्व प्रतिष्ठान संचालित माध्यमिक विद्यालयात ध्वजवंदन सरपंच बबन टाकळकर यांच्या उपस्थितीत झाले. संस्थेचे सचिव लहू कांबळे यांनी बोधिसत्व प्रतिष्ठानच्या वतीने शाळेस नवीन लाऊडस्पिकर सिस्टीम शाळेस भेट दिली. केश मुथा व संदीप जाधव यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस दिले. अतिदुर्गम आदिवासी भागातील करंजगाव पठारावर डोंगरवाडी शाळेत स्वातंत्र्यदिनी होप फॉर चिल्ड्रेन फाउंडेशनच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना दप्तर व शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kjg22b00404 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..