मावळातील पशुधनावर लंपीचा प्रादुर्भाव आजाराला रोखण्यासाठी प्रशासनाच्या वेगवान हालचाली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मावळातील पशुधनावर लंपीचा प्रादुर्भाव 
आजाराला रोखण्यासाठी प्रशासनाच्या वेगवान हालचाली
मावळातील पशुधनावर लंपीचा प्रादुर्भाव आजाराला रोखण्यासाठी प्रशासनाच्या वेगवान हालचाली

मावळातील पशुधनावर लंपीचा प्रादुर्भाव आजाराला रोखण्यासाठी प्रशासनाच्या वेगवान हालचाली

sakal_logo
By

कामशेत, ता. २ ः गेल्या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात थैमान घातलेल्या त्वचारोग लंपी या साथीच्या आजाराने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. पुणे जिल्ह्यातील उर्से (मावळ) व कळंब (आंबेगाव) येथे लंपीग्रस्त जनावरे आढळली आहेत. त्याचा प्रादुर्भाव सर्वत्र होऊ नये, या हेतूने प्रशासनाने वेगवान हालचाली सुरू केली आहे. यामध्ये सर्वप्रथम ज्या गावात लंपीग्रस्त जनावरे आढळली. त्या परिसरातील दहा किलोमीटरमधील सर्व गावांमध्ये लसीकरण सुरू केले आहे परंतु हे दिले जाणारे लसीकरण ‘गोट पॉक्स’ हे म्हणावे तितके प्रभावशाली दिसत नाही. त्यामुळे मावळातील पशुधनावर लंपीच्या प्रादुर्भावाची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः सजग राहण्याची गरज आहे.
दरम्यान, या आजाराशी दोन हात करण्यासाठी जनावरांचा गोठा स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. गोठ्यात पाणी साचू देऊ नये, यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे. गाई-म्हशीमधील सर्व वयाच्या जनावरांना हा आजार रोग होऊ शकतो. परंतु लहान वयाच्या जनावरांना याचा संसर्ग होण्याची शक्यता असते.

लंपी आजाराची लक्षणे
हा विषाणूजन्य आजार असल्याने बाधित जनावरे अशक्त होतात. जनावरांची दूध उत्पादन क्षमता घटते. प्रजनन क्षमतेवरही विपरीत परिमाण होतो. सुरवातीस २ ते ३ दिवस जनावरांना बारीक ताप जाणवतो. यानंतर जनावरांच्या सर्व शरीरावर कडक व गोल आकाराच्या गाठी येतात. या गाठी साधारणपणे पाठ, पोट, पाय व जननेंद्रिय आदी भागात येतात. बाधित जनावरांच्या डोळ्यातून व नाकातून पाणी येते. तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो. पायावरील गाठींमुळे जनावरांना चालताना त्रास होतो.

संसर्ग न होण्यासाठी काय करावे
निरोगी जनावरांना या आजाराचा संसर्ग होऊ नये, यासाठी बाधित जनावरे वेगळी बांधावीत. प्रसार बाह्य कीटकांद्वारे होत असल्याने आजारी नसलेल्या जनावरांना तसेच गोठ्यात डास, माशा, गोचीड आदींचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक औषधांची फवारणी करावी. देशी वंशांच्या जनावरांपेक्षा संकरित जनावरांना याचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक आहे.
चौकट
बैलगाडा शर्यती रद्द
या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे जिल्ह्यातील भोरवाडी व वडगाव काशिंबेग येथे होणाऱ्या बैलगाडा शर्यतींचे आयोजन रद्द करण्यात आलेले आहे. तसेच अनेक ठिकाणचा जनावरांचा आठवडे बाजार देखील रद्द करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया

लसीकरण केल्यानंतरही शेतकऱ्यांनी स्वच्छतेच्या बाबतीतील सर्व काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच जनावरांची खरेदी-विक्री टाळावी.
- डॉ. सतीश भोसले, पशुवैद्यक अधिकारी, कामशेत
-

फोटोः 00947

Web Title: Todays Latest Marathi News Kjg22b00415 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..