चिखलसेच्या सरपंचपदी सचिन मधुकर काजळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिखलसेच्या सरपंचपदी सचिन मधुकर काजळे
चिखलसेच्या सरपंचपदी सचिन मधुकर काजळे

चिखलसेच्या सरपंचपदी सचिन मधुकर काजळे

sakal_logo
By

कामशेत,ता.१२ ः चिखलसेच्या सरपंचपदी सचिन मधुकर काजळे यांची निवड झाली. माजी सरपंच सुनील काजळे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागी निवडणूक झाली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी प्रकाश बलकवडे यांनी काम पाहिले. निवडणुकी दरम्यान आठ सदस्यांपैकी एक सदस्य गैरहजर राहिले. त्यामुळे, चार विरुद्ध तीन असे मतदान झाले.
यावेळी तालुका भाजपचे अध्यक्ष रविंद्र भेगडे यांनी नवनिर्वाचित सरपंच सचिन काजळे यांचा सत्कार केला. यावेळी अमोल शेटे, बंटी भेगडे, संदीप भेगडे, राहुल घाग, सचिन भेगडे यांच्यासह चिखलसे व अहिरवडे येथील कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपा तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे म्हणाले,‘‘माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या चिखलसे ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडीत भाजपने मारली बाजी मारली. आम्ही राजकीय डावपेच आखत चिखलसे ग्रामपंचायतीवर सचिन काजळे यांच्या रूपाने भाजपचा झेंडा फडकविला आहे.’’