
दिशा संस्थेकडून ६० मुलींना शैक्षणिक मदत
कामशेत,ता.१८ ः मावळ तालुक्यातील ८ गावांमधील ६० गरजू मुलींच्या शिक्षणासाठी दिशा संस्थेमार्फत, त्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या निम्म्या रकमेपोटी एकूण १ लाख ९३ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.
संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ जठार, यशवंत लिमये, श्रीमती इंदु गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे प्रकल्प अधिकारी प्रवीण भोईरकर यांनी ही मदत दिली. वडिवळे, वळक, मुंढावरे, बुधवडी, वेल्हवळी, उंबरवाडी, नेसावे,फांगणे या आठ गावांचा त्यामध्ये समावेश होता. या सर्व मुलींना इंदू गुप्ता व प्रदीप गुप्ता यांच्या हस्ते धनादेश वितरित करण्यात आले. दिशा संस्था गेल्या २० वर्षांपासून मावळ तालुक्यातील महिला सक्षमीकरण व ग्रामविकासासाठी कार्यरत आहे. या कार्यासाठी देसाई बंधूंचे आर्थिक सहकार्य मिळत आहे. या कार्यक्रमाला सुनीता थोरवे, वर्षा टाकळकर, प्रिती टाकळकर, अनिषा वाघमारे, स्वाती मालुसरे, ऋतुजा मोहिते, ऋतुजा शिरसाट, अनिता थोरात उपस्थित होत्या.