जिल्हा बँकेच्या भात खरेदीला शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा बँकेच्या भात खरेदीला शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद
जिल्हा बँकेच्या भात खरेदीला शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद

जिल्हा बँकेच्या भात खरेदीला शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद

sakal_logo
By

कामशेत, ता. ३ः मावळ तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांकडुन इंद्रायणी भात खरेदी हमीभावाने सुरू करण्यात आल्याने भात उत्पादक शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तर खरेदी केलेल्या भाताचे पेमेंट लगेच मिळत असल्याने शेतकरी समाधान आणि आनंद व्यक्त करीत आहेत. मावळ तालुक्याचे आमदार सुनिल अण्णा शेळके आणि जिल्हा बँकेचे संचालक माऊली दाभाडे यांच्या संकल्पनेतून ही हमीभाव योजना मावळ तालुक्यात राबविली जात आहे. यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक भरीव अर्थसाहाय्य करीत आहेत. तालुक्यातील ५५ सहकारी शेती विकास सोसायट्या भात खरेदी योजना राबवीत आहेत. मावळ तालुक्यातील भात पिकांची कापणी नुकतीच संपलेली आहे. काही शेतकऱ्यांनी आपल्या भाताची झोडणी पूर्ण केली आहे. यावर्षी प्रथमच शेती विकास सोसायट्या शेतकऱ्यांचे भात २४ रुपये हमीभावाने खरेदी करीत आहेत. आतापर्यंतचा हा सर्वात जास्तीचा हमीभाव आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना त्याच दिवशी आपल्या मालाच्या वजनाप्रमाणे पेमेंट दिले जात आहे. भात खरेदीच्या पहिल्या टप्प्यात नवलाख उंबरे, ताजे, चिखलासे, सुदुंबरे, चावसर, ऊर्से, धामणे, वडेश्वर, निगडे, माळेगाव, बेबेडओहळ, आढले, कार्ला या १३ सोसायट्यांनी भात खरेदी जोरात सुरू केलेली आहे. यासाठी सचिव संजय ढोरे, धर्मा ठोंबरे, संभाजी केदारी, सुनिल गाडे, रामदास पाठारे, गुलाब ढोरे, उमेश वाडेकर, अंकुश पिंपरकर, रविंद्र हिंगे, तुकाराम लोहोर, सचिन भानुसघरे हे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे वरिष्ठ अधिकारी नीरज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भात खरेदीचे काम करीत आहेत.

मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पिकणाऱ्या व ग्राहकांची सर्वाधिक पसंती असलेल्या इंद्रायणी भाताची विविध कार्यकारी सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून थेट खरेदी करून ग्राहकांना भेसळमुक्त ब्रँडेड तांदूळ विक्री करण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने हाती घेतला आहे. याउपक्रमामुळे शेतकऱ्यांबरोबरच ग्राहकांचाही मोठा फायदा होणार आहे.
माऊली दाभाडे संचालक,पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक