
महाविकास आघाडीच्या मोर्चाला कामशेतच्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा
कामशेत, ता. १८ ः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरुद्ध वक्तव्य केल्याप्रकरणी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याविरुद्ध मुंबई येथे महाविकास आघाडीकडून विराट मोर्चाचे आवाहन शनिवार (ता. १७) रोजी करण्यात आले होते. महाविकास आघाडीच्या मोर्चाला कामशेतच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरोधात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी अवमानकारक वक्तव्य केले होते. याचा निषेध करत या विरोधात विविध स्तरावरून पडसाद उमटले होते.
मावळ तालुक्यामधून आमदार सुनील शेळके व राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी या मोर्चाचे प्रतिनिधित्व केले. यांच्या प्रतिनिधित्वाखाली कामशेत शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष नीलेश दाभाडे, सरपंच रूपेश गायकवाड, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती गजानन शिंदे, तालुका कामगार सेल अध्यक्ष मंगेश राणे, मारुती जाधव, सचिन शिंदे, पोपटराव चव्हाण, बाळासाहेब शिंदे, सदस्य दत्तात्रय शिंदे, अभिजित शिंगारे आदी कार्यकर्ते या मोर्च्यात सहभागी झाले होते.