ग्रामविकास अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामविकास अधिकाऱ्याला 
लाच घेताना रंगेहात पकडले
ग्रामविकास अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले

ग्रामविकास अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले

sakal_logo
By

कामशेत, ता. १३ ः कामशेत ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्याला दहा हजारांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. गुरुवारी दुपारी एक वाजता ही कारवाई केली. विलास तुकाराम काळे (वय ४६, रा. विघ्नहर अपार्टमेंट, रामटेकडी, हडपसर पुणे) असे संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक श्रीराम शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कामशेतमध्ये फिर्यादीने जागा घेऊन पत्र्याचे शेड बांधले होते. त्याची नोंद करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी विलास काळे यांच्याकडे अर्ज केला. नोंद करण्यासाठी बारा हजार रुपयांची त्यांनी मागणी केली. या बाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार सापळा रचून ग्रामपंचायत कार्यालयात गुरुवारी एक वाजता दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना काळे यांना रंगेहात अटक करण्यात आली.