सततच्या वाहतूक कोंडीने 
कामशेतची ‘आर्थिक कोंडी’

सततच्या वाहतूक कोंडीने कामशेतची ‘आर्थिक कोंडी’

कामशेत, ता. १७ ः ग्रामीण मावळची मुख्य बाजारपेठ म्हणून कामशेत शहराची ओळख आहे. सुमारे सत्तर खेड्यातील नागरिक कामशेत बाजारपेठेला जोडली आहे.कामशेतच्या भाताच्या गिरण्या,लग्न बस्त्याची प्रमुख दुकाने, सराफ बाजारपेठ प्रसिद्ध आहे. परंतु शहरात होणाऱ्या सततच्या वाहतूक कोंडीमुळे कामशेत बाजारपेठ आर्थिक कोंडीत सापडली आहे. वाढते शहरीकरण, वाहनांचा वाढता वापर आणि शहरात नसलेली पार्किंगची सोय यामुळे ग्रामीण भागातील ग्राहक महामार्गावर असलेल्या दुकानांकडे व वडगाव, तळेगाव-पिंपरी चिंचवडकडे खरेदीसाठी वळू लागला आहे.

रस्त्यांवरील दुकानदारांचे अतिक्रमण हेच वाहतूक कोंडीचे मुख्य कारण आहे.
बाजारपेठेतील अनेक दुकानदारांची दुकाने रस्त्यावर आलेली आहे. रात्रीची वेळ साधून अनेक दुकानदार आपल्या दुकानांची बांधकामे वाढवित, दुकानांच्या खोल्यांचे बांधकाम एकेरी विटांचे साह्याने करीत आहेत. भविष्यात अतिक्रमण काढण्याची वेळ आली तरी मोठे नुकसान होणार नाही. अतिक्रमणाचा विषय ऐरणीवर येईपर्यंत वाढविलेल्या खोल्या उत्पन्न मिळवून देणार आहेत. एकंदरीत आर्थिक नुकसान होणार नाही, याची दक्षता दुकानदारांनी घेत अतिक्रमण केल्याचे दिसून येते.


नागरिक म्हणतात...
- पार्किंगची सोय नसल्याने गाडी रस्त्यावरच उभी करावी लागते
- वाहतूक पोलिस कर्मचारी फोटो काढून लगेचच ऑनलाईन दंड आकारतात
- दुचाकीवरून जरी खरेदीला जावे म्हटले तर बऱ्याचदा अर्धा-पाऊण तास वाहतूक कोंडी
- खरेदीला जास्त वेळ लागणार असेल तर वाहतूक कोंडीतील वेळ व लागणारा दंड वाचावा म्हणून दुसऱ्या शहरात जाणे योग्य ठरते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com