विद्याधामच्या माजी विद्यार्थ्यांकडून शाळेस १४ फॅन भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्याधामच्या माजी विद्यार्थ्यांकडून शाळेस १४ फॅन भेट
विद्याधामच्या माजी विद्यार्थ्यांकडून शाळेस १४ फॅन भेट

विद्याधामच्या माजी विद्यार्थ्यांकडून शाळेस १४ फॅन भेट

sakal_logo
By

शिक्रापूर, ता. २३ : येथील विद्याधाम प्रशालेत सन १९९९-२००० या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीत असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत शाळेसाठी १४ सिलींग फॅन भेट दिले. विशेष म्हणजे यापुढील काळात प्रत्येक वर्षी अशाच गरजेच्या वस्तू शाळेसाठी देणार असल्याची ग्वाही विद्यार्थ्यांनी दिली. त्यानुसार १४ फॅन शाळेला औपचारिकपणे देऊ केले. यासाठी माजी विद्यार्थी अॅड. अतुल ताजणे, ग्रामविकास अधिकारी सदानंद फडतरे, अशोक भुजबळ, माजी सरपंच सुषमा हरगुडे, उद्योजक किरण राऊत, जितेंद्र फंड, ऋषिकेश करंजे, सचिन गायकवाड, प्रकाश सासवडे, दीपक सासवडे, रवींद्र उमाप, सारिका पोखरकर, शबाना शेख, संदीप पवार आदींसह प्रमुख माजी विद्यार्थ्यांनी आपले योगदान दिले. या वेळी प्राचार्य सोनबापू गद्रे, उपप्राचार्य सुनील थोरात, पर्यवेक्षक संजय शेळके, माजी उपसरपंच सुभाष खैरे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील मांढरे उपस्थित होते.