द्रुतगती मार्गावरील अपघातात चालकाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

द्रुतगती मार्गावरील अपघातात चालकाचा मृत्यू
द्रुतगती मार्गावरील अपघातात चालकाचा मृत्यू

द्रुतगती मार्गावरील अपघातात चालकाचा मृत्यू

sakal_logo
By

लोणावळा, ता. १३ : मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटात शुक्रवारी (ता. १३) सकाळी भरधाव ट्रेलर व टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात ट्रेलरचालकाचा मृत्यू झाला. शंकर विनोद खरबी (वय ३३, रा. नागपूर) असे मृत्युमुखी पडलेल्या चालकाचे नाव आहे. यामुळे द्रुतगती मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळित झाली.

महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईच्या दिशेने लोखंडी कॉइल घेऊन निघालेल्या ट्रेलरचे (एमएच ४० एके २४९५) बोरघाटात अंडापॉइंट जवळ तीव्र उतार व वळणावर ब्रेक निकामी झाल्याने ट्रेलरचे दुभाजक तोडत समोरून येणाऱ्या टेम्पोला (एमएच ४५ एएफ ०६७८) जोरात धडक दिली. घटनेनंतर ट्रेलर मार्गावर आडवा झाल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळित झाली. अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलिस, बोरघाट वाहतूक पोलिस मदत केंद्र, आयआरबी कंपनी, देवदूत पथकाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होत मदतकार्य सुरू करण्यात आले. बोरघाटात वाहतुकीची कोंडी झाल्याने वाहतूक लोणावळा, खोपोलीतून जुन्या महामार्गाने वळविण्यात आली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Lon22b01370 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top