लोणावळ्यात लाचप्रकरणी तिघांवर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोणावळ्यात लाचप्रकरणी तिघांवर गुन्हा
लोणावळ्यात लाचप्रकरणी तिघांवर गुन्हा

लोणावळ्यात लाचप्रकरणी तिघांवर गुन्हा

sakal_logo
By

लोणावळा, ता. १४ : तक्रारदाराच्या गॅस एजन्सीवर कारवाई न करण्यासाठी दोन लाखांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती दीड लाख रुपये लाच स्वीकारल्याप्रकरणी लोणावळा ग्रामीणच्या पोलिस निरीक्षकासह तिघांवर गुन्हा दाखल झाला.

याप्रकरणी सहायक उपनिरीक्षक कुतुबुद्दीन गुलाब खान (वय ५२), खासगी इसम यासीन कासम शेख (वय ५८) यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. लोणावळा ग्रामीणचे पोलिस निरीक्षक प्रवीण बाळासाहेब मोरे (वय ५०) यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला. तक्रारदाराच्या गॅस एजन्सीवर कारवाई न करण्यासाठी मध्यस्थामार्फत दोन लाखांची मागणी केली होती. तक्रारदाराने (वय ३९) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. शुक्रवारी (ता. १३) लोणावळा ग्रामीण पोलिस ठाणे परिसरात सापळा लावला होता. तडजोडअंती ठरलेली दीड लाखांची लाच शेख याच्यामार्फत स्वीकारताना खान यांस लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. कारवाईची माहिती मिळताच निरीक्षक मोरे फरार झाले. शनिवारीही (ता. १४) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई सुरू होती.

Web Title: Todays Latest Marathi News Lon22b01371 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top