अध्यक्षपदी विलास बडेकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अध्यक्षपदी विलास बडेकर
अध्यक्षपदी विलास बडेकर

अध्यक्षपदी विलास बडेकर

sakal_logo
By

लोणावळा, ता. २३ ः लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी माजी उपनगराध्यक्ष विलास बडेकर यांची तर कार्याध्यक्षपदी रवी पोटफोडे यांची नियुक्ती करण्यात आली.
विशेष म्हणजे शहराध्यक्षपदी वर्णी लागलेले विलास बडेकर यांनी अवघ्या काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. लोणावळा नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक प्रस्तावित आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर खांदेपालट सुरु आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जीवन गायकवाड हे खंडाळ्यातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांनी संघटनात्मक जबाबदारीतून मोकळे होत बडेकर यांच्या नावास हिरवा कंदील दाखविला. माजी नगरसेवक बडेकर यांनी हातात घड्याळ बांधल्याने आगामी नगरपरिषद निवडणुकीमध्ये संघटनात्मक बांधणीवर जोर देणार असल्याचा मानस व्यक्त करत आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेमध्ये सत्ता आणण्याचा विश्वास व्यक्त केला.


फोटो ः 01712 , 01711

Web Title: Todays Latest Marathi News Lon22b01373 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top