वाकसई सोसायटीच्या अध्यक्षपदी सुनीता केदारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाकसई सोसायटीच्या 
अध्यक्षपदी सुनीता केदारी
वाकसई सोसायटीच्या अध्यक्षपदी सुनीता केदारी

वाकसई सोसायटीच्या अध्यक्षपदी सुनीता केदारी

sakal_logo
By

लोणावळा, ता. ३ ः वाकसई विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी सुनीता अमोल केदारी यांची व उपाध्यक्षपदी बाळासाहेब गबळाजी आहेर यांची बिनविरोध निवड झाली. सोसायटीच्या नूतन संचालक मंडळाची नुकतीच निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडली होती. त्यानंतर संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीची घोषणा करण्यात आली. या वेळी राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन बाळासाहेब भानुसघरे, संचालक भरत येवले, धोंडू शिंदे, काशिनाथ शेलार, विजय देसाई, धोंडिबा केदारी, शांताराम शेलार, खंडू येवले, किसन येवले, नितीन विकारी, मनिषा देशमुख तसेच ज्येष्ठ नेते किसन आहेर, मारुती देशमुख, हनुमंत आहेर, बबन माने, सीताराम केदारी आदी उपस्थित होते. बिनविरोध निवडीनंतर ग्रामस्थांनी भंडाऱ्याची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत आनंद साजरा केला. निवडणूक अधिकारी म्हणून व्ही. जे. तळपे यांनी व सहायक म्हणून सचिव अंकुश टाकळकर, मंगेश केदारी यांनी काम पाहिले.


फोटो ः 01739

Web Title: Todays Latest Marathi News Lon22b01386 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top