सासऱ्याचा खून करून फरार जावयास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सासऱ्याचा खून करून 
फरार जावयास अटक
सासऱ्याचा खून करून फरार जावयास अटक

सासऱ्याचा खून करून फरार जावयास अटक

sakal_logo
By

लोणावळा, ता. ७ ः कुरवंडे येथे सासऱ्याचा खून करून फरार झालेल्या जावयास अटक करण्यात लोणावळा शहर पोलिसांना यश आले आहे. संतोष नथू वाघमारे (वय३०, सध्या रा. कातकरी वस्ती, कुरवंडे, मावळ, मूळ रा. माणगाव, जि. रायगड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या हल्ल्यात आरोपीची पत्नीही गंभीर जखमी झाली आहे. संतोष पांडू वाघमारे (वय ४५, रा. कातकरी वस्ती, कुरवंडे, मावळ) असे या खून झालेल्या सासऱ्याचे नाव असून मनिषा संतोष वाघमारे (वय २६) असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पत्नीचे नाव आहे. संतोष नथू वाघमारे याच्या मूळ गावी राहण्यास जाण्यावरून त्याच्यात व पत्नी मनिषा यांच्यात वाद होते. रविवारी (ता. ५) गावी जाण्यावरून मनिषा आणि तिचे वडील संतोष पांडू वाघमारे यांनी आरोपीस नकार दिल्याने चिडून जात संतोष नथू वाघमारे याने सासऱ्याच्या डोक्यात कोयत्याने वार केले. यामध्ये त्यांचा जागीच ठार झाले. यावेळी मध्ये आलेल्या मनिषा हिच्यावरही आरोपीने वार केल्याने ती गंभीर जखमी झाली. मनिषा वाघमारे हिच्यावर पनवेल येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलिसांनी कुरवंडे परिसर पिंजून काढत आरोपी संतोष नथू वाघमारे यास जेरबंद केले.

Web Title: Todays Latest Marathi News Lon22b01393 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top