लोणावळ्यात गिरवले योगाचे धडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोणावळ्यात गिरवले योगाचे धडे
लोणावळ्यात गिरवले योगाचे धडे

लोणावळ्यात गिरवले योगाचे धडे

sakal_logo
By

लोणावळा, ता. २१ : आंतरराष्ट्रीय योग दिवस लोणावळ्यात उत्साहात साजरा करण्यात आला. येथील जागतिक किर्तीचे योग प्रशिक्षण केंद्र असलेल्या कैवल्यधाम, पतंजली योग विद्यापीठ, तसेच विविध संघटनांच्या वतीने कार्ला लेणी, भाजे लेणी, कोराईगड किल्ला, संत बाळूमामा मंदिर आदी ठिकाणी विशेष योगसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


कैवल्यधाम संस्थेत लोकप्रतिनिधी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विविध योग, प्राणायामांचे प्रात्यक्षिक करण्यात आले. भांगरवाडीतील तसेच नगर परिषद कार्यालय येथे योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. खंडाळा येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह प्रशिक्षणार्थींना योगाचे धडे देण्यात आले.

भाजे येथील श्रीमती शांतीदेवी गुप्ता विद्यालयात स्काऊट पथकातील विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य लाभले. तुंगार्ली येथील गुरुकुल हायस्कूल, कार्ला येथील एकवीरा विद्या मंदीर तसेच परिसरातील शाळांमध्ये शिबिराचे आयोजन करण्यात आले. संपर्क बालग्राममधील अनाथ मुलांनीही योगाचे धडे गिरवले. नौसेनेच्या आयएनएस शिवाजी, लोणावळा महाविद्यालय, नगरपरिषद शाळांसह खासगी शाळांमध्ये योगसंस्कार शिबिर पार पडले.
-----------------------------

भाजे लेणी (लोणावळा): योग दिनाचे औचित्य साधत येथील भाजे लेणीच्या सानिध्यात प्रात्यक्षिके सादर करताना विद्यार्थी.

Web Title: Todays Latest Marathi News Lon22b01409 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top