शिवसेना कार्यकर्त्यांचे एकवीरा देवीस साकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेना कार्यकर्त्यांचे
एकवीरा देवीस साकडे
शिवसेना कार्यकर्त्यांचे एकवीरा देवीस साकडे

शिवसेना कार्यकर्त्यांचे एकवीरा देवीस साकडे

sakal_logo
By

----------------------
लोणावळा, ता. २७ ः उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री म्हणून कायम राहावेत व सध्याची राजकीय अस्थिरता निघून जावी, यासाठी मावळ तालुक्यातील शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांच्यावतीने ठाकरे परिवाराची कुलदेवता असलेल्या एकवीरा देवीला साकडे घातले. उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, सुरेश गायकवाड, बाळासाहेब फाटक, दत्ता दळवी, अंकुश देशमुख, महेश केदारी, शादान चौधरी, अनिता गोणते, गबळू ठोंबरे, भारत ठाकूर, शाम सुतार, अनिल ओव्हाळ आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. बंडखोरीमुळे शिवसेनेसह राज्याचे वातावरण ढवळून निघाले आहे. सध्या यावर अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिले आहे. एकनाथ शिंदे यांचा गट शिवसेनेवर दावा करत आहे; तर उद्धव ठाकरे यांचीच शिवसेना असल्याचे उद्धव ठाकरे गटाकडून सांगण्यात येत आहे. यामध्ये आता एकीकडे शिंदे समर्थक शिंदे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी रस्त्यावर उतरत आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ देखील कार्यकर्ते रस्त्यावर उतरताना दिसत आहेत. मावळातील शिवसैनिकांनी ठाकरे घराण्याची कुलदेवता असलेल्या कार्ला येथील आई एकवीरा देवी मंदिरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना नेते उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदी कायम राहावेत, यासाठी महाआरती करत साकडे घालण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांच्या वतीने एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
फोटो ः 01788

Web Title: Todays Latest Marathi News Lon22b01412 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..